vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन नागरीक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन नागरीक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

रायगड( प्रतिनिधी- रोहा तहसिलदार कार्यालया मार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” रोहा शहरातील जेष्ठ नागरीक सभागृह येथे दि.5 जुलै 2025 रोजी सकाळी 10.00 वा. संपन्न होणार आहे. या शिबीरास नागरीक,शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे व विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहा तहसीलदार डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवड हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध विभागातील सेवाबाबत मंजुरी पत्र दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेचे काही प्रश्न असल्यास त्याबाबत देखील समाधान होण्याबाबत आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तालुक्यातील सर्व विभागाचा सहभाग राहणार असून विविध विभागाच्या नवीन योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या शिबीरा दरम्यान विविध योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सद्य: परिस्थितीत नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले या शिबीरात देण्यात येणार आहेत.

शिबीरात रोहा तालुक्यातील अनुक्रमे पंचायत समिती रोहा, तालुका कृषी, तालुका आरोग्य, उपअभियंता, म.रा.वि.मं. रोहा, उप अधिक्षक भूमि अभिलेख रोहा, संजय गांधी निराधार, पुरवठा, निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन विभाग कडील विविध उपक्रमे व त्याची माहिती बाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक,प्रमाणपत्र परीक्षार्थीने हस्तगत करण्याचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

vishwatmaklokswamivarta

बांधकाम प्रकल्पांचे निरीक्षण ‘आयओटी-एआय’द्वारे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहृन्मुंबई महानगरपालिकेला ‘रिअल-टाईम’ प्रणाली उभारण्याचे निर्देश

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन