vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला

बुलढाणा, प्रतिनिधी: ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियमामधील तरतुदींनुसार हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या दृष्टीने होणार आहे.आरक्षण सोडतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध समाजघटकांचे सशक्तीकरण आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित होणार आहे.ही आरक्षण सोडत दि 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार असून, देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, देऊळगाव राजा यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी…

१८ डिसेंबरपासून #माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सर्वांगीण सुविधा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती..

vishwatmaklokswamivarta

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-  रोहयो मंत्री भरत गोगावले