vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान33.50 लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी ;महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा- मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान33.50 लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी ;महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा- मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत औषधी व वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला असून याअंतर्गत 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

केंद्र पुरस्कृत औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेअंतर्गत 2015-16 पासून राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ मार्फत राबविण्यात येत होता. सदर योजनेअंतर्गत सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीमध्ये 818.23 हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आलेली असून त्याकरिता रक्कम 415.12 लाख रुपये एवढे अनुदान अदा करण्यात आलेले आहे. तथापि सन 2020-21 पासून औषधी वनस्पती घटक हा राष्ट्रीय आयुष अभियानाचा घटक नसल्याचे तसेच सन 2021-22 पासून औषधी वनस्पती लागवड योजना बंद करण्यात आली असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. हा घटक आयुष मंत्रालयाकडून कृषी मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड किंवा वृक्ष लागवड व फुलपिक लागवड कार्यक्रम राबवण्याबाबत राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आईन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा व करंज या 16 वृक्षवर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान देय आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन 2025-26 मध्ये रक्कम 33.50 लाख रुपये एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिलेली आहे. औषधी व सुगंधी वनस्पतीचे पीक निहाय आर्थिक मापदंड ठरविण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदानभविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – नितीन गडकरी..

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमानडॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण – घेवाणशहरातील आझाद मैदानावर महोत्सवाचे आयोजन