vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

रायगड ( प्रतिनिधी : न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये संवाद व सामंजस्याच्या माध्यमातून तडजोड साधण्यासाठी “राष्ट्रासाठी मध्यस्थी” (Mediation for the Nation) ही विशेष मोहिम रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ही मोहिम दिनांक ०१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा न्यायालय रायगड व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राबविली जात आहे.

या मोहिमेंतर्गत कौटुंबिक वाद, मोटार अपघात नुकसानभरपाई, धनादेश न भरल्याच्या (चेक बाऊन्स) तक्रारी, वाटप दावे, वाणिज्यिक दावे तसेच इतर सर्व तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे सामंजस्याच्या माध्यमातून निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मध्यस्थी ही न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद, खर्चिकदृष्ट्या कमी व गोपनीयता जपणारी पद्धत असून, यात कोणत्याही पक्षावर निर्णय लादला जात नाही. न्यायालयात प्रलंबित असलेल्या व तडजोडीयोग्य असलेल्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्ष आपसात थेट संवाद साधून सुसंवादातून आपली समस्या सोडवू शकतात.

या मोहिमेचे मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.मध्यस्थी मोहिमेची वैशिष्ट्ये: स्वेच्छिक सहभाग,गोपनीयता राखली जाते,वेळ आणि खर्च वाचतो,सामंजस्यातून निर्णय,

 न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत व ते ही प्रकरणे सामंजस्यातून मिटवू इच्छितात, त्यांनी जिल्हा न्यायालय रायगड, तालुका न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2024 साठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 जुलै 2025

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण