vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये*जिल्हाधिकारी संतोष पाटील*

पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये*जिल्हाधिकारी संतोष पाटील*

सातारा प्रतिनिधी-दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे.

दिनांक 5 जुलै रोजी भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त अंदाजानुसार सातारा जिल्ह्यासाठी दिनांक 5 व 6 जुलै 2025 रोजी *ऑरेंज अलर्ट* देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

 दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ, पूला वरून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये. शार्टकट मार्ग म्हणून धोकादायकरित्या पाण्यातून प्रवास करु नये. नियमित रस्ताही पाण्याखाली गेला असल्यास पोलीस व तालुका प्रशासन यांना तात्काळ अवगत करावे. आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये. सर्व नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, सतर्क रहावे, असे आवाहन संतोष पाटील यांनी विद्यार्थी, पालका तसेच जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

ड्रॅगन पॅलेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून ग्रीन बस मिळणार,*ड्रॅगन पॅलेस मध्ये संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विक्रम होणार*

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

vishwatmaklokswamivarta

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta