vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी-

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. आ. विलास भुमरे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड हे याप्रसंगी उपस्थित होते. अंबिकापूर ता. छत्रपती संभाजीनगर येथील मोसंबी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची त्यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मोसंबी सारखे फळपिक आणि ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे आहे,असे त्यांनी सांगितले. तसेच यंत्रणेला त्वरीत पंचनाम्यांचे काम पूर्ण करावे असे निर्देशही दिले. त्यानंतर श्री. सामंत हे जालना जिल्ह्यातील भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

०००००

संबंधित पोस्ट

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी  – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन…

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट