vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासूनविद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासूनविद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान

      सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत दि. 14 ते 18 जुलै 2025 या कालावधीत विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकरिता शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंध व पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगली व मिरज येथील तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयात शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रथम टप्प्यात सांगली जिल्ह्यातील निवडक 50 महाविद्यालयात दररोज 10 कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 9 समतादूत पूर्ण क्षमतेने या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच, संबंधित सर्व संस्थांचे सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

 

00000

संबंधित पोस्ट

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना

एसएसबी परीक्षा पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी  उमेदवारांच्या २ मे रोजी मुलाखती…

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..