vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा लक्षवेधी सूचना -नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्य वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा लक्षवेधी सूचना -नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्य वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या खात्यात जमा होणाऱ्या वेतनातील रक्कम दुसऱ्याने काढल्यास, तो प्रकार फौजदारी गुन्हा मानला जाईल आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून कामगारांचे वेतन थेट व सुरक्षितपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

vishwatmaklokswamivarta

जव्हार अर्बन बँकेच्या नोकर भरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे · अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना-शासनास जमिन विक्री करू इच्छिणाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !‘सनातन प्रभात’चे कार्य राष्ट्र उभारणीसाठी !– श्री. रवींद्र प्रभुदेसाई