vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !‘सनातन प्रभात’चे कार्य राष्ट्र उभारणीसाठी !– श्री. रवींद्र प्रभुदेसाई

दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !‘सनातन प्रभात’चे कार्य राष्ट्र उभारणीसाठी !– श्री. रवींद्र प्रभुदेसाई

    मुंबई प्रतिनिधी तन प्रभात’ने प्रारंभीपासूनच राष्ट्र, धर्म, समाज यांसाठीच वाहून घेतले. हे ‘सनातन प्रभात’चे वेगळेपण आहे. सनातन प्रभातचे कार्य हे राष्ट्र उभारणीसाठी आहे. हिंदु राष्ट्र स्थापण्याची वेळ आली आहे. ईश्वरेच्छेने हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे प्रतिपादन ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीचा २६ वा वर्धापनदिन सोहळा दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यात मार्गदर्शन करतांना श्री. प्रभुदेसाई बोलत होते. यावेळी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली वर्तक उपस्थित होत्या. त्यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याला ‘सनातन प्रभात’चे धर्माभिमानी वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, तसेच साधक यांची उपस्थिती लाभली.
  वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण करून करण्यात आला. त्यानंतर ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
  ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे म्हणाले, ‘हिंदूंनी न्यूनगंड सोडला पाहिजे. सन्मानाने जगता येण्यासाठी केवळ हीच भूमी आहे. क्षात्रतेजाची उपासना करणे काळाची आवश्यक आहे. ही उपासना केली, तर भविष्यात आपण टिकू शकतो. हिंदुत्वाची भूमिका सातत्याने मांडायला हवी. भारत हिंदूंसाठी आहे; परंतु हिंदूंसाठी भारत एकमेवच आहे, हे हिंदूंनी समजून घ्यायला हवे.
  दैनिक ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली वर्तक म्हणाल्या, ‘सनातन प्रभात’ने राष्ट्र आणि धर्म यांच्या विचारांचे बीज पेरण्याचे जे कार्य केले आहे, त्याचा आज वटवृक्ष झाला. ‘सनातन प्रभात’ केवळ प्रसारमाध्यम समूह नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या वैचारिक पुनरुत्थानाच्या चळवळीतील एक घटक बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने दिलेल्या वृत्तांमुळे आदर्श समाजव्यवस्थेच्या दिशेने छोटे-मोठे परिवर्तन चालू झाले आहे. वाचकांनीही रामराज्य स्थापनेच्या या कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा !’
00000

संबंधित पोस्ट

मांग-मातंग समाजासाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा ११ मे रोजी 📢📚

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण.

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नागपूर-अत्याधुनिक सुविधायुक्त ‘गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे