vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वदेस फाउंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात (दि.07 जुलै 2025 ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)रविंद्र शेळके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, तसेच स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, तुषार इनामदार वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार व मेघना फडके व सहाय्यक व्यवस्थापक जुलेखा शेख उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने डॉ.नितीन बावडेकर, स्वदेस फाउंडेशन यांच्यावतीने मंगेश वांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ.सुरेंद्र यादव, उपसंचालक आरोग्य-स्वदेस फाउंडेशन यांनी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 या करारनाम्याचा मुख्य उद्देश शासनाच्या आरोग्यसेवा मजबूत करणे आणि ग्रामीण समुदायांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यात मदत करणे हा आहे. या सहकार्याद्वारे स्वदेस फाउंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी मदत करणार आहे. ही भागीदारी समुदायावर आधारित शासकीय आरोग्य कार्यक्रमांबाबत जनजागृती वाढवेल आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्याची खात्री करेल.

रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांची स्वदेस फाउंडेशन रायगड जिल्हामधील महाड, पोलादपूर,माणगाव, तळा, श्रीवर्धन,म्हसळा व सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणासाठी समग्र 360-अंश दृष्टिकोनातून कार्य करणारी स्वयंसेवी संस्था या तालुक्यामध्ये सामंजस्य करारा मुळे फायदा होणार आहे.

००००

संबंधित पोस्ट

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..

परळ  येथील एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय , गणपती विसर्जन होताच बंद होणार

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…

मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामांना गती  खासदार नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा…

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta