vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

 

अमरावती, : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 15 जुलै 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सिकची रिसोर्ट वलगाव ता. जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

 

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in यावेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणक्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामाचे होणार सर्वेक्षण- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेØ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने करणार सर्वेक्षणØ विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी 

vishwatmaklokswamivarta

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात 35 ठिकाणी रविवारी विशेष स्वच्छता, सुशोभिकरण मोहीम..