vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसायस्थानिक बातम्या

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथील सार्वजनिक ई व्ही चार्जींग स्टेशन जनतेसाठी खुले…

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथील सार्वजनिक ई व्ही चार्जींग स्टेशन जनतेसाठी खुले…

 

       नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहभागातून नेरुळ येथील सीवूड मॉल जवळील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात नवीन ई व्ही चार्जींग स्टेशन ( EV – Electric Vehicle Charging Station) हे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ०५ जून २०२५ रोजीपासून जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.  ही सुविधा नवी मुंबईकरांसाठी पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.ई व्ही चार्जींग स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा:

1) दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी चार्जिंग सुविधा 2) दोन गन फास्टर चार्जर (CCS2 – 30kW)

3) मोबाईल अ‍ॅपद्वारे चार्जिंगसाठी आगाऊ बुकींग सुविधा

4) सार्वजनिक वापरासाठी २४x७ सेवा उपलब्ध

5) सुरक्षित आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा

6) आधुनिक आग प्रतिबंधक उपाययोजना

7) विश्रांतीसाठी शांत परिसर व खेळाचे मैदान8) परवडणारे दर आणि सोयीस्कर वापर

 ही सेवा सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे इलेक्ट्रीक वाहनधारकांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चार्जिंगची सोपी व सुरक्षित सुविधा पुरविणे हा आहे. जेणेकरून हरित व प्रदूषणमुक्त नवी मुंबई घडविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.

  नवी मुंबईतील या पहिल्या सार्वजनिक ई व्ही चार्जिंग स्टेशनमुळे, शहरात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, आणि पर्यावरण रक्षणास चालना मिळेल असा विश्वास नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

  त्या अनुषंगाने सर्व इलेक्ट्रीक वाहन धारकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ कल्याण आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक२५१ वाहनचालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…