vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण…

रायगड प्रतिनिधी:- खरीप हंगाम 2025-26 मधील राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील  पाटील यांच्याहस्ते काल  नियोजन भवन येथे करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे, उप व्यवस्थापक मुंबई भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई सौ. शिल्पी मिश्रा, जिल्हा प्रतिनिधी रायगड पुरुषोत्तम सरनाईक, अलिबाग तालुका प्रतिनिधी  राहुल लांडगे आदि उपस्थित होते.

पीक पेरणीपासून ते काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक किड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी करणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाच्या विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसानभरपाई मिळणार आहे. यावर्षी राज्य शासनातर्फे पीकविमा योजनेमध्ये अत्यंत चांगले बदल करण्यात आले असून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.  पिकविमा योजनेबद्दल शेतकऱ्यांचे असलेले गैरसमज दूर करण्यामध्ये सगळ्यांनी आपले योगदान द्यावे. तसेच  पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घ्यावा,  असे अहवान यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट

vishwatmaklokswamivarta

उद्यानांचा विकास करावा स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि संकल्पना लक्षात मुंबईचे महापौर रितू यांचे अधिकाऱ्यांना निर्देश…

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी

महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश…

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे