vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट योजना) अर्ज भरण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट योजना) अर्ज भरण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

रायगड, प्रतिनिधी: आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे लाभ मिळविण्यासाठी https://www.nbtribal.in या एन.बी. पोर्टलवरून १५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

मात्र, अनेक लाभार्थ्यांना पोर्टलवर अर्ज सादर करताना अडचणी येत असल्याने आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी वैयक्तिक किंवा सामूहिक लाभाच्या योजनेसाठी दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ जुलै २०२५ पर्यंत nbtribal.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण,आत्माराम धाबे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्कप्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगडदूरध्वनी क्रमांक:०२१४३–२५२५१९

००००

संबंधित पोस्ट

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार.

पुण्यात सीएनजी हायड्रो टेस्टिंग दरात वाढ – रिक्षा चालक संघटनांचा आंदोलनाचा इशारा

प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्‌यांचा उत्सव – ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;शेतमाल तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..

vishwatmaklokswamivarta

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार