vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

पंढरपूर, प्रतिनिधी:- श्री संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले. श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले.

 यावेळी मुख्यमंत्री यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सर्वश्री आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य, आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज, श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. संतांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो. संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान आहे. अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व व्हर्च्युअल वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही आर दर्शन सुविधा विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. गॉगलद्वारे देवाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

सौदी अरेबियातील भारतीय राजदूत डॉ. सुहेल अजाज खान यांनी विविध प्रदेश आणि प्रांतांमधील भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी व्हर्च्युअल संवाद साधला… 

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन