vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट

‘श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट

 

गडचिरोली, प्रतिनिधी – ‘विदर्भाची काशी – श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ या माहितीपटाने समाज माध्यमावर लोकप्रियतेचे नवे शिखर गाठले आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियोजन भवन येथे झालेल्या औपचारिक कार्यक्रमात या माहितीपटाचे विमोचन झाले. त्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘फेसबुक’ पेजवर हा माहितीपट प्रसारित करण्यात आला असून, अवघ्या काही दिवसांतच त्याला तब्बल ५ लाख ५३ हजार व्ह्युव्स मिळाले आहेत.

हा माहितीपट माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयामार्फत साकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे विमोचन पार पडले होते.

माहितीपटाचे वैशिष्ट्य:

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिर – ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, स्थापत्य व पुरातत्त्वीय महत्त्व या लघुपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मंदिर, नागर शैलीतील शिल्पकला, रामायण-महाभारतकालीन कोरीव कामे, तसेच विविध धार्मिक उत्सवांचे दृश्यरूप चित्रण.

धार्मिक व सांस्कृतिक समृद्धी – महाशिवरात्र, श्रावण सोमवारच्या गर्दीतील भक्तिरस, ‘विदर्भाचे खजुराहो’ म्हणून निर्माण झालेली कलात्मक ओळख.

पर्यटन विकासास चालना – माहितीपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत या प्राचीन स्थळाची ओळख पोहोचत आहे.

सामाज माध्यमातील यश-सदर माहितीपटाने फेसबुकवर विक्रमी ५,५३,२७५ हून अधिक व्ह्युव्स, अनेक शेअर्स आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे.

भविष्यातील दिशा-या माहितीपटामुळे जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठिकाणांची माहिती समाज माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नासही मोठी चालना मिळाली आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन व माहिती कार्यालयाकडून पुढील काळातही ‘गडचिरोली ग्लिम्प्स’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर आधारित अशाच दर्जेदार माहितीपटांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी यांनी सांगितले आहे

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीमहाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणातून अनेक कुटुंबांना दिलासा – निवासी आयुक्त आर. विमला

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’**शिवकालीन दुर्लभ शस्त्र प्रदर्शन के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम का सजीव दर्शन!*

स्ट्र्क्चरल ऑडिटबाबत नागरिकांना आवाहन

घर घर संविधानराज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर झाले कार्निवलमय* *कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ*