vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घर घर संविधानराज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट

घर घर संविधानराज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून आपल्या सगळ्यांना समता न्याय आणि अधिकार दिला आहे. या राज्यघटनेबद्दल विदेशात कमालीचा आदर आहे. आपण प्रत्येकाने या राज्यघटनेचा अभिमान बाळगायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी येथे केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात घर घर संविधान अभियानांतर्गत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत या कार्यक्रमास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना, संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, रामदास दौड तसेच सर्व विभागप्रमुख व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, घरघर संविधान या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संविधानाविषयी जागरुकता निर्माण करुन संविधानात सामान्यांच्या अधिकार कर्तव्याबाबत जाणीव जागृती करावी.जाणकारांनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा. ही सर्वसमावेशक घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला देण आहे. या घटनेमुळेच मीही आज तुमच्या समोर उभा आहे.

 दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले तसेच विभागीय आयुक्त गावडे यांनीही आपल्या मनोगतातून संविधानाची महती सांगितली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद,एकाच दिवसात हजारो महसुली प्रकरणांचा निपटारा

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन**आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी; एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण*

vishwatmaklokswamivarta

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

vishwatmaklokswamivarta