vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा*

*राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा*

सातारा प्रतिनिधी भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सातारा मुख्य डाकघर, सातारा सिटी, एम. आय. डी. सी. सातारा, संगमनगर, वाई, कोरेगाव, लोणंद, महाबळेश्वर, फलटण, पांचगणी या पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त इतर ही ठिकाणी सदर राखी पाकिटे स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

नागरिकांनी राखी पाकिटे ऑफिस मध्ये व्यवस्था केलेल्या पत्र पेट्या / ट्रे मध्ये टाकावी किंवा टपाल कर्मचारी यांच्याकडे द्यावीत. तसेच राखी साठी पोस्ट ऑफिसने तयार केलेल्या विशिष्ट कव्हरचाही उपयोग करावा व जलद गतीने पाठवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचाही वापर करावा.

 काही अडचण असल्यास पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. त्यामुळे आपली राखी पाकिटे लवकरात लवकर वितरण करता येतील. राखी पाकिटे स्वीकारणाऱ्याचा पत्ता पिनकोड व मोबाइल क्रमांकासह लिहावा. जेणेकरून राखी पाकिटांचे लवकरात लवकर वितरण होईल.

0000

संबंधित पोस्ट

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड

दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई कारवाईत अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा…

शिक्षकांवर अन्‍याय करणारे शासन निर्णय रद्द करा ,मार्च महिन्‍याचे वेतन तात्‍काळ करा-सोमवारी विमाशि संघाचे धरणे / निदर्शने आंदोलन