vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड

            राज्य प्रतिनिधी भाजपा नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या शिफारशीनुसार रेणापूर आणि लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची जाहीर करण्यात आली असून रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर यांची तर लातूर तालुका बन्सी भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक जनहिताचे निर्णय घेतले जात आहेत. भाजपाचे नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या शिफारशीनुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांनी रेणापूर आणि लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर केली आहे. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी सदरील नियुक्तीचे पत्र नुकतेच संबंधितांना पाठविले आहे.

    नव्याने गठीत करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीत रेणापूर तालुका समिती अध्यक्ष सतीश आंबेकर नरवटवाडी, सदस्य ललिता अरुण कांबळे पानगाव,अनुसया कोंडीराम फड कुंभारवाडी, विठ्ठल काशिनाथ कस्पटे निवाडा, विजय लक्ष्मण चव्हाण रेणापूर, गोविंदराव नानासाहेब देशमुख डिगोळ देशमुख, सदानंद केदारनाथ पिंपळे खरोळा, कुलदीप राजकुमार सूर्यवंशी आरजखेडा, दीपक संदिपान पवार वाला, सुरेश रामराव बुट्टे आनंदवाडी यांची तर लातूर तालुका समिती अध्यक्ष बन्सी भगवानराव भिसे सारसा, सदस्य रुपेश सूर्यकांत काळे भातखेडा, श्रीमती अनिता पांडुरंग बालवाड भातांगळी, श्रीमती श्रुती विनाश सवयी मुरुड, रमेश उद्धव लहाडे रूई, बाबासाहेब साहेबराव भिसे गाधवड, अरविंद फुलचंद पारवे शिराळा, राजकुमार काशिनाथ सुरवसे चिंचोली ब, विनायक मल्हारी मगर रामेगाव, योगीराज रामराव साखरे भिसेवाघोली यांचा समावेश करण्यात आला आहे.

   रेणापूर आणि लातूर या दोन्ही समिती नियुक्त करून निराधारांना आधार देण्याचे काम केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंग राजे भोसले भाजप नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार व्यक्त करून नवनिर्वाचित अध्यक्षासह समिती सदस्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

महाज्योती मधील संशोधक विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध होताच शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम दिली जाईल- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

सुप्रसिद्ध बॉलीवूड आसामी गायक झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश…

vishwatmaklokswamivarta

सिडकोच्या घरांची ऑनलाईन नोंदणी सुरु

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे पल्स परिषदेतील चर्चासत्रात सहभागी तज्ञांचे मत