vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस,राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस,राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

            मुंबई, प्रतिनिधी : हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी ‘’शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

     भारतरत्न डॉ. स्वामिनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. त्यांच्या महान कार्य, योगदान, समर्पण आणि नम्रतेसाठी भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये ‘भारतरत्न’ नागरी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, संयुक्त राष्ट्रांनी त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक असे गौरवले आहे. ‘शाश्वत शेती दिनानिमित्त’ राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ स्थापन करण्यात येणार आहे.भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इ. बाबीतील विशेष कार्य विचारात घेऊन त्यानुंषगाने ‘शाश्वत शेती दिन’ राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर, विद्यापीठस्तरावर साजरा करणे, त्यांच्या नावे पुरस्कार देणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.कृषी आयुक्त कार्यालयाला या दिवसाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे असे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

*****

संबंधित पोस्ट

२१ जून रोजी ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा; नागरिकांनी सकाळी ६:४५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन

मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार ‘शाळा सुरक्षा कार्यक्रम’;300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क कायद्याचा व्यापक प्रचार करा – राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

नगर विकास विभागाच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आज 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे