vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण…

 

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते थाटात पार पडले.

कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदाप्रवास करता येणार आहे, असे सांगितले.

परभणी विभागाअंतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगारांसाठी एकूण 70 बीएस-6 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारांसाठी प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. नवीन बीएस-6 मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*

राजधानीत मराठी भाषा – संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री उदय सामंत दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

vishwatmaklokswamivarta

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..