vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

ग्राम महसुल अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळानव्या प्रणालींच्या कार्यपद्धती जाणून घ्या- विभागीय आयुक्त दिलीप गावडे०ग्रामिण भागात लोकांना प्रभावी सेवा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ग्राम महसुल अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळानव्या प्रणालींच्या कार्यपद्धती जाणून घ्या- विभागीय आयुक्त दिलीप गावडे०ग्रामिण भागात लोकांना प्रभावी सेवा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – महसुल विभागात अनेक नवीन संगणकीय प्रणालींचा अंतर्भाव झाला आहे. प्रशिक्षणातून या प्रणालींची कार्य पद्धत जाणून घ्यावे,असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केले.

महसुल विभागाच्या कार्यपद्धती जाणून घेऊन लोकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी प्रशिक्षणाचा वापर करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केले.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या सभागृहात आज ग्राम महसुल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, नीलम बाफना, तहसिलदार डॉ. कुष्णा कानगुळे, स्वरुप कंकाळ, नितीन गर्जे, सुनिल सावंत, सारंग चव्हाण, विद्याचरण कडवकर, तलाठी महासंघाचे अनिल सुर्यवंशी, सतिष तुपे, डॉ. देविदास जरारे, सतिष भदाणे, धनंजय साळवे, अण्णासाहेब गोवडे, रिमा पुरी आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गावडे यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात प्रशिक्षण आवश्यक असते. हल्ली ऑनलाईन प्रणाली विकसीत झाल्या असून त्याचा महसुल प्रशासनात वापर होत आहे. या सर्व प्रणालींची माहिती तज्ज्ञांकडून करुन घेणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन लोकांना उत्तम सेवा द्या.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, लोकांना उत्तम सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचे आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावे. या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व ग्राम महसुल अधिकारी , नायब तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी, सर्व तहसिलदार यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

०००००

संबंधित पोस्ट

देशात लवकरच १०० टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथेजिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत