vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद· संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद· संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

मुंबई प्रतिनिधी- संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने मानवी तस्करी या समस्येबाबत चर्चा व्हावी, जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “संवेदनशीलता ते संकल्प: शोषणाविरोधात लढा” या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे केले आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.

जगभरातील अनेक देश मानवी तस्करी या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी विरोधात लढा देत आहेत. भारतातही मानवी तस्करी हा चिंतेचा विषय आहे. मानवी तस्करीचे प्रकार, तस्करी ओळखणे, तस्करी रोखण्यासाठी संबंधित घटकांना प्रशिक्षण, यंत्रणांतील समन्वय, पीडितांना मदत, न्यायलयीन सहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन तसेच जागरूकता मोहिम आदी विषयांवर देशभरातील तज्ञ व्यक्ती या परिसंवादात विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात पोलिस, रेल्वे पोलिस दल, कायदेतज्ज्ञ, सरकारी वकील, महिला व बाल संरक्षण अधिकारी, परिवहन क्षेत्र, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

००००

संबंधित पोस्ट

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य

सायप्रस राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मुंबईत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा हॉटेल ताज पॅलेस येथे पारंपरिक लोककलांचा जागतिक मंचावर होणार देखणा आविष्कार

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta

शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान…

vishwatmaklokswamivarta