vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत कार्यालयास पोलीस अधिकाऱ्यांची भेट व गटचर्चा

 धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत कार्यालयास पोलीस अधिकाऱ्यांची भेट व गटचर्चा

मुंबई प्रतिनिधी- गेल्या तेरा वर्षापासून सुरू असलेल्या धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत या सामाजिक संस्थेच्या संत कक्कया मार्गावरील कार्यालयाला व त्यांची कार्य जाणून घेण्यासाठी तसेच विभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या समस्या यातील वाद विवाद तसेच नशाबंदी याविषयी माहिती देणे व घेणे याकरिता दिनांक 30 जून 2025 रोजी रात्री आठ ते नऊ या वेळात धारावी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षिका संगीता माने यांनी अकस्मित सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांना सुखद आनंदाचा धक्का दिला त्यावेळी श्रीमती अलका साबळे यांनी त्याचे स्वागत केले तसेच या पंचायत मार्फत गेली तेरा वर्षे सुरू असलेल्या कार्यपद्धती व उपक्रमाबद्दल त्यासोबतच हॅपिनेस जेष्ठ नागरिक संघ यांच्या बद्दलची सविस्तर माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना श्री दिलीप गाडेकर यांनी करून दिली त्यानंतर श्रीमती संगीता माने यांनी विभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व बालकांच्या तसेच नशा मुक्ती संदर्भात जनजागृती व्हावी काही माहिती असल्यास पोलिसांची मदत घ्यावी असे उपस्थितना मार्गदर्शन केले या चर्चेदरम्यान एन शिवराज उद्यान सोनेरी गार्डन एमपी नगर ढोर वाडा येथे सुरू असलेल्या नशा बहादूर व दादागिरी करणाऱ्या लोकांबद्दल तसेच सुरक्षितेबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली यावेळी अशोक काळे शंकर पोटे सविता शेरखाने गिरीराज शेरखाने परशुराम जाधव चतुर गायधनकर नामदेव आबनावे व गोविंद भोईटे यांनी मनोगती मांडली तर कार्यक्रमाचे शेवटी मंगेश खरटमल यांनी आलेले पोलीस अधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांचे मानले संगीता माने यांनी पोलीस पंचायत नोंदवही शेरा मारून शुभेच्छाही दिल्या फक्त दत्ता खंदारे यांनी सर्व वृत्त व फोटोग्राफी पार पाडली

संबंधित पोस्ट

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे व श्रीमती लता एकनाथ शिंदे यांचे Enumeration Form आज भरून घेण्यात आले.

मुंबईत दसरा आणि नवरात्र उत्सवासाठी ३०,००० पोलिस कर्मचारी तैनात

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन