vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर जाऊन पक्ष संघटन मजबूत करा – संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असतांना शिवसेना बांधतेयनिष्ठावंतांची मोट – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर जाऊन पक्ष संघटन मजबूत करा – संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असतांना शिवसेना बांधतेयनिष्ठावंतांची मोट – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना,प्रतिनिधी)-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांच्या पार्शवभूमीवर जालना जिल्ह्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेबठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या सर्कलनिहाय बैठकांचे आयोजन जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले आहे. याबैठकांत जि.प. गटातील प्रमुख कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात येत आहे.

आज गुरुवार ३१ जुलै रोजी दुसर्‍या दिवशी बदनापूर तालुक्यातील शेलगाव,

रोषणगाव, दाभाडी, बाजार गेवराई, जामखेड, रोहिलागड, ताडहादगाव, पारनेर या

जिल्हापरिषद गटातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठका संपन्न झाल्या. या

बैठकांना मार्गदर्शन करतांना संपर्कप्रमुख घोसाळकर म्हणाले की,

जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकायच्या असतील तरकार्यकर्त्यांनी गावपातळीवर जाऊन पक्ष संघटन मजबूत करावे, असे सांगितले.यावेळी उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदारसंतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम,हनुमान धांडे, बदनापूर तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अंबड तालुकाप्रमुखदिनेश काकडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना घोसाळकर म्हणाले की,जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाला अनुकूल वातावरण असून आगामी निवडणुकाआपणास अत्यंत नियोजनबद्ध व कठोर परिश्रम घेऊन लढायच्या आहेत. कोणत्याहीपरिस्थितीत गाफील न राहता गाव पातळीवर जाऊन प्रत्येक शाखाप्रमुख,बुथप्रमुख, बीएलए यांच्या नेमणुका करून संघटन बांधणी मजबुत करण्याचेआवाहन संपर्कप्रमुख घोसाळकर यांनी केले.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर म्हणाले की,आज जिल्ह्यातमोठ्या प्रमाणावर सर्व पक्षामधील पदाधिकारी पक्षांतर करतांना दिसत आहे.यात कोणतीही पक्षनिष्ठा, विचार, तत्व बाजुला ठेवून केवळ गुत्तेदारीच्याकारणास्तव हे पक्षांतर होत आहे. पक्ष सोडून जाण्यासाठी कोणतीही सबळ कारणेनाहीत, धोरण नाही, पक्षाने कोणता अन्याय केला याचे उत्तर नाही, तरीहीसत्ताधारी पक्ष पदाधिकार्‍यांना त्यांच्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न करतआहेत, असे किळसवाणी चित्र असतांनाही जनतेत मात्र कसल्याही प्रकारची चिडनसल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभुमीवर पक्षातीलनिष्ठावंत पदाधिकार्‍यांची मोट बांधून पक्ष संघटन मजबुत करण्याचा प्रयत्नसातत्याने करण्यात येत असल्याचे जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले. यावेळीउपनेते लक्ष्मण वडले, माजी आमदार संतोष सांबरे यांनी पदाधिकार्‍यांनाठिकठिकाणी मार्गदर्शन केले.यावेळी भरत मदन,किशोर मदन, अंकुश शिंदे,श्रीराम कान्हेरे, पद्माकर पडूळ,केशव क्षीरसागर,रामेश्वर फंड, रामभाऊ मसलेकर, सुदाम काळे, परमेश्वरमात्रे, प्रसाद चव्हाण, दत्तू नन्नवरे, गोवर्धन पवार, अमजद बेग, बळीरामकोल्हे, ज्ञानेश्वर पवार, जब्बार पटेल, अंकुश वाघ, नारायण हकवणे, संजयकाटकर, रुद्रा काटकर, तात्याराव शेळके, संजय जाधव, रावसाहेब पैठणे,पठाण,विनायक कोळकर, प्रल्हाद मदन, सुभाष मदन, शिवाजीराव मदन, भाईजान मिर्झा,कृष्णा कोल्हे, संजय कोल्हे, शिवाजी राऊत, सोपान भांड, नाथा काळे, गजाननबोंद्रे, सुभाष आरसूळ, ज्ञानेश्वर गरबडे, पूजा टेहरे, कृष्णा खंडेकर,बालाजी चव्हाण, अल्ताफ पटेल,अनिल शेळके, रवींद्र आरसूळ, रवींद्र बोडके,सचिन झरेकर, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आरसुळ, अंबादास गीते, काकासाहेबढाकणे, जगन दुर्गे, कल्याण टकले, बंडू पागिरे, मुकूंद हुसे, सितारामधुळे, विजय जाधव, लक्ष्मणा आढाव, विलास वाघ, गजानन सानप, शैलेश दिवटे,सिध्देश्वर उबाळे, प्रल्हाद जाधव, रोहिणी तोगे, गोवर्धन उगले यांच्यासहआदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

vishwatmaklokswamivarta

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी नागरिकांनी विविध विषयांवर आपले मत द्याव

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार, मदत व बचाव कार्याचा दावोस येथून समन्वय..

vishwatmaklokswamivarta