vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी:- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, ठाणे यांच्या वतीने दि.27 जुलै 2025 रोजी सहकार विद्यालय, कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्दिष्ट गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आजारी नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार आणि मुख्यमंत्री आरोग्य निधीची माहिती व मदत पुरविणे हे होते.या शिबिरात विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे तज्ञ डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये 1 हजार 510 नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.या शिबिरत ECG, रक्तदाब, हृदय विकार तपासणी, मोतीबिंदू, चष्म्याची तपासणी, श्रवण तपासणी, घसा तपासणी, महिलांचे आरोग्य, लहान मुलांची तपासणी, पोषण तपासणी, सांधेदुखी, हाड तपासणी, दातांचे आरोग्य व स्वच्छता, अ‍ॅलर्जी, त्वचेचे विकार, होमिओपॅथी – पर्यायी औषधे व जीवनशैली सल्ला इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. काही रुग्णांकरिता CBE (Clinical Breast Examination) हे मॅमोग्राफी व्हॅनच्या सहायाने करण्यात आले.

अशा शिबिरांमध्ये न्यूरोसर्जन विभाग हा फार महत्त्वाचा ठरतो, कारण मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची लक्षणे सामान्य लोकांना ओळखता येत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांची उपस्थिती आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मोफत मार्गदर्शन व उपचार गरजूंसाठी मोठा आधार ठरला.

शिबिरादरम्यान एक बालरुग्ण सतत अविरत अंग कंप यामुळे गंभीर अवस्थेत शिबिरात दाखल झाला. वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच त्वरित उपस्थित बालरोग तज्ञ आणि न्यूरो तज्ञांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर कळवा येथील शासकीय रुग्णालयात तातडीने रुग्णाला रिफर करून रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले. त्यानंतर रुग्णाच्या पालकांना समजावून सांगून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्राथमिक उपचार अहवाल देण्यात आले, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्ष डॉ.प्रियांका यादव यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन  

जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

माजी सैनिकांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका आणि अँटॉप हिल पोलिस, वाहतूक पोलिस  यांच्या संयुक्त कारवाईने 10 वर्षांनंतर दुपदरी रस्ता झाला मोकळा..

vishwatmaklokswamivarta

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे