vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संकल्पशील आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या संकल्पनेतून तळणी येथे पार पडली महिलांना बचत गटातून स्वावलंबी बनवण्याची मार्गदर्शनपर बैठक…

संकल्पशील आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या संकल्पनेतून तळणी येथे पार पडली महिलांना बचत गटातून स्वावलंबी बनवण्याची मार्गदर्शनपर बैठक…

राज्य प्रतिनिधी -चूल आणि मुलं संकल्पेनवर आधारित आजवर जीवन जगलेल्या माता भगिनींनी आता ह्या नव्या युगात स्वावलंबी बनल पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, ह्याच दृष्टीकोनातून व संकल्पनेतून आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली काल रेणापूर तालुक्यातील तळणी येथे महिला बचत गट व शेतकरी महिला बचत गट या विषयावर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. 🔥✌🏻ह्या बैठकी दरम्यान बचत गटाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनावर कसं काम करता येईल?बँकेकडून लोन कसे मिळेल?त्यात सबसिडी किती असेल?अशा अनेक विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं.ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येऊन काम करावे, जेणेकरून आपला उद्धव निर्वाह भागवण्यासाठी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा देणे ही काळाची गरज आहे. 💪🏻

हे प्रामुख्याने प्रत्येक शेतकऱ्याने व त्याच्यासोबत काम करणाऱ्या घर चालवणाऱ्या गृहिणीने व त्यांनी दोघांच्याही विचाराने आपल्या शेतीला जोडधंदा दिला, तर आपली आर्थिक प्रगती होऊ शकते व ती काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन व भविष्यातील कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी हे गरजेचं आहे, असं मला वाटतं.

भविष्यात कुठलीही काहीही गरज पडली तर एक भाऊ म्हणून आपण मला जी काही मदत मागाल ती मदत पूर्णपणे करण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन.🙇🏻‍♂️✌🏻 त्यासाठी आपल्याला काय करायचंय? याचा योग्य तो निर्णय प्रत्येकाने ठामपणे घ्यावा.कारण की, एखादा उद्योग चालू करायचा म्हणलं तर दोन्ही बाजूंनी विचार करायचा असतो त्याचा आपणास फायदा पण होऊ शकतो, आणि तोटा बनवू शकतो. त्यामुळे जर समजा कुणाला बचत गटाच्या माध्यमातून काही उद्योग चालू करायचा असेल आवर्जून माझ्याशी संपर्क करावा. 🤝✌🏻या बैठकीला श्रीमती. अनुसया फड, श्री. गुट्टे साहेब व भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा श्रीमती. अर्चनाताई तसेच तळणी, मोहगाव, कारेपूर व रामवाडी येथील काही प्रमुख महिलांच्या उपस्थित बैठक पार पडली.

00000

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी खाद्यजत्रा; बचतगटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ-पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta