vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

जालना, प्रतिनिधी)- गणेशोत्सव व स्व. किशनलाल प्रेमचंद काठोठीवाले (बडे पहेलवान) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले व डॉ. राम कुलकर्णी यांच्या संयुक्तविद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन काद्राबाद येथील तेली पंचायत वाडायेथे करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.यावेळी शहरप्रमुख बाला परदेशी, शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले, डॉ. राम कुलकर्णी, चंद्रकात उबाळे, शिवाजी शेळके, दिनेश भगत, बबन काजळे, अश्विनअंबेकर, कुंदनलाल काठोठीवाले, गणेश काठोठीवाले, अनिल वाघमारे, रमेश गौरक्षक आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी स्व. किशनलाल काठोठीवाले यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा देत म्हटले की, प्राचीन भारतीय औषध निर्माणाचे उदाहरण देतांना त्यांनी अनेक महाभारत व रामायणातील घटनांचा उल्लेख केला. रामायणातील उदाहरण सांगतांना ते म्हणाले की, लक्ष्मण युध्दात जखमी होवून बेशुध्द पडले असता ते कोणत्या

वनस्पतीमुळे बरे होऊ शकतात हे तेंव्हाचे वैद्यराज सुसेन यांनी हनुमंताला

सांगितले. त्या वनस्पतीचे वापर करताच लक्ष्मण या संकटातून बाहेर आले.जुन्या काळात ग्रामीण भागामध्ये आजारी पडल्यानंतर शास्त्र नव्हते काहीनव्हते पण माहिती असणारे वैद्य होते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या आजारावर घरगुती उपाय केले पाहिजे, त्यामुळे कसल्याही प्रकारे दुष्परिणाम होत नसायचे. आज सर्व रुग्णालयात प्रचंड गर्दी दिसते. दवाखान्यात उपचार घेणेहे अत्यंत खर्चिक झाले आहे. त्यामुळे आपण आजारीच पडू नये यासाठी शारिरीक व्यायाम श्रम अत्यंत महत्वाचे आहे. आज अनेक स्वंचलित यंत्रामुळे मानवी जीवन अत्यंत सुखदायक झाले. परिणाम मानवीची रोगप्रतिकार शक्ती कमी होवून आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पुर्वीच्या काळी भाजी करतांना स्वयंपाक घरात हळदी, सुंठ, मिरीचा वापर केला जात असे, त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढून व्याधींचे प्रमाण कमी असायचे. परंतु आजच्या काळात मानवाचा आहार,विहार यात बदल झाल्याने मोठ्या प्रमाणावर रोगाचे प्रमाण वाढले आहे. अशाआजारावर पुर्वीच्या उपचार पध्दती व औषधोपचार याने आजही त्यावर मात करतायेते, परंतु सर्व प्रथम अशा उपचार पध्दतीवर विश्वास ठेवणे गरजेचेअसल्याचे अंबेकर यांनी सांगितले.

……….चौकट

समाजाचे हित लक्षात घेवून आरोग्य शिबीर

शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना आयोजक शहराचे शहरप्रमुख दुर्गेशकाठोठीवाले यांचे अंबेकर यांनी कौतुक करतांना म्हटले की, आज सर्वत्रगणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात मोठ-मोठ्या मुर्त्यां डिजेंचे कर्णकर्कशआवाज, भव्य लाईटींग यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतांना काठोठीवाले परिवाराने मात्र या सर्व बाबींना फाटा देत समाजाचे हित लक्षात घेवूनआरोग्य शिबीर आयोजित केले. याचा फायदा अनेक रुग्णांना झाला. त्यातून खुपचांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे अंबेकरयांनी सांगितले.यावेळी मदनलाल नारियलवाले, बजरंग राजपुत, सेवक नारियलवाले, डॉ गंगाबिशनगौरक्षक, मोहन अबोले,सर्जेराव जाधव, देवबंद चौधरी, अभिमन्यु काठोठीवाले,विजय शेदरकर, नंदलाल मेघावाले, सुनिल खरे, मनिष नंद, सुनिल नंद, प्रकाशपवार, वसंत राजेजाधव, नंदलाल शेडीवाले, हेमचंद्र शेडीवाले, गणेश ऐलगुदे,तुकाराम मिसाल, राजेंद्र पोरवाल, भगवान सिदंनकर आदींची उपस्थिती होती.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा पुन्हा सर्व्हे करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय रेल्वे लवकरच आपली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित

vishwatmaklokswamivarta