vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वसुंधरा दिनानिमित्त फेस कॉम ग्रुप ज्येष्ठांची निसर्ग उद्यानाला भेट…

 वसुंधरा दिनानिमित्त फेस कॉम ग्रुप ज्येष्ठांची निसर्ग उद्यानाला भेट…

[ मुंबई प्रतिनिधी-जागतिक वसुंधरा दिनानिमित्त फेस्कॉम संलग्न हॅपिनेस्ट ज्येष्ठ नागरिक संघ धारावी यांच्या माध्यमातून विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी करिता महाराष्ट्र निसर्ग उद्यान माहीम धारावी येथील उद्यान परिसरात एका विशिष्ट निसर्ग फेरी व माहिती संकलनाकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या वेळात विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यान गाठले त्या उद्यानातील विविध प्रकारची फुलपाखरे वृक्ष पक्षी गांडूळ खत औषधी वनस्पती घरगुती वापरातली झाडे व प्रदूषित मिठी नदी या विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन गाईड मार्गदर्शिका श्रीमती वर्षा कोळी यांनी आम्हा जेष्ठ नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे व सरळ सोप्या भाषेत येथील सर्व उपक्रमांची माहिती ज्ञात करून दिली 37 एकरवर धारावी डम्पिंग ग्राउंड वर वसलेल्या व मानव निर्मिती साठी उपयुक्त असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती करून त्याचा उपयोग सार्वजनिक जीवनात कसा करू शकतो व भविष्यातील धोके ओळखून कचरा निर्मूलन प्लास्टिक निर्मूलन यासह प्रदूषण व नदी नाल्यांची स्वच्छता तसेच या उद्यानात असलेल्या मानवी जीवनाकरिता लागणारी औषधांची झाडे फुले फळे व इतर सर्व बाबींची माहिती मिळण्यास आम्हाला मदत झाली याकरिता माननीय संचालक श्री तुषार शिंदे साहेब यांनी आम्हा जेष्ठांना विनामूल्य फेरी व प्रदर्शनाकरिता परवानगी दिली त्यामुळे हे शक्य झाले यामध्ये धारावी मॉर्निंग वॉकर ग्रुप झोपडपट्टी पोलीस पंचायत व हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ यांनी सहभाग घेतला यावेळी मुंबई नवी मुंबईचे संपर्क सचिव दिलीप गाडेकर यांनी पुढाकार घेतला होता यांच्यासह मोहन साळवी ईश्वर पोळ नवनाथ पाखरे अलका साबळे महादेव सोनवणे सविता शेरखाने बबन सोनवणे भाऊ कदम शंकर पोटे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम दरम्यान सर्व ज्येष्ठांना अल्पोहाराची व्यवस्था मॉर्निंग वॉकर्स ग्रुपने केली होती कार्यक्रमाचे शेवटी प्रमुख मार्गदर्शक दिलीप गाडेकर यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यान धारावी संचालक व निसर्ग मार्गदर्शिका यांचे आभार मानले

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta