vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू काश्मिरात कुलगाम इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत, तीन दशतवादी ठार, शोध मोहीम सुरू.

जम्मू काश्मिरात कुलगाम इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत, तीन दशतवादी ठार, शोध मोहीम सुरू….

राज्य प्रतिनिधी-जम्मू काश्मिरात कुलगाम इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत, तीन दशतवादी ठार, शोध मोहीम सुरू. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत सुरक्षा दलांनी3 दहशतवाद्याला ठार मारले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यात सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अखल जिल्ह्यातील जंगली भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली
सांगितले की, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात घेराबंदी मजबूत करण्यात आली आहे आणि अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत.
२ दिवसांपूर्वी पूंछमध्ये झाली चकमकयापूर्वी ३० जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी…

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन