vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक…

राज्य प्रतिनिधी-राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या नावाने काही फसव्या वेबसाईट्स आणि बनावट अर्जाची दुवे सध्या सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. या बनावट दुव्यांवर क्लिक केल्यास नागरिकांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती जसे की आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, ओळखपत्रांचे तपशील आदी चोरी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, शासनाच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर पात्रतेची यादी, अर्ज करण्याचा थेट दुवा किंवा पात्र महिलांची नावे अशा स्वरूपाची माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट लिंकवर विश्वास ठेवू नये व त्यावर कोणतीही माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना आहे. योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु, ही योजना जनतेत लोकप्रिय होत असताना काही फसवे लोक बनावट वेबसाईट्स तयार करून नागरिकांची फसवणूक करत आहेत, ही गंभीर बाब आहे. यामुळे अनेक महिलांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लाडकी बहिण योजनेबाबत अधिकृत माहिती केवळ शासनाच्या संकेतस्थळावरच मिळेल. सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट अर्ज, व्हिडीओ किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती भरण्यापूर्वी ती माहिती अधिकृत आहे की नाही, याची खात्री करावी.

फसव्या लिंकवर माहिती भरल्यामुळे काही जणांची बँक खाती रिकामी होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. कुणीही आपली वैयक्तिक माहिती अनोळखी संकेतस्थळांवर भरू नये. योजनेसंदर्भातील शंका असल्यास जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न;शासकीय योजना व सुविधेचा लाभ जेष्ठानी घ्यावा- जिल्हाधिकारी..

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक– महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे

भारतीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी रोजी का साजरा केला जातो?

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

vishwatmaklokswamivarta