vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..

सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..

राज्य प्रतिनिधी-सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता वाहनचालकांना परवाना मिळवण्यासाठी सोलापूर शहरात जाण्याची गरज उरलेली नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाहन परवाना तपासणीसाठी मोहीम राबवली जाणार आहे. याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच परवाना तपासणीसाठी सुविधा मिळणार आहे. ही व्यवस्था तेवीस जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.

या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे ठराविक दिवशी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उदा. मंगळवेढा येथे प्रत्येक महिन्यातील पहिला, दुसरा आणि तिसरा सोमवार, मंद्रूप-बोरामणी येथे शेवटचा सोमवार, पंढरपूर येथे प्रत्येक मंगळवार व बुधवार, बार्शी येथे प्रत्येक गुरुवार, अक्कलकोट येथे पहिला व तिसरा शुक्रवार, तर मोहोळ येथे दुसरा व चौथा शुक्रवार या दिवशी परवाना तपासणी होईल. हे सर्व ठिकाणी आरटीओ कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहतील.दरमहा एकशे ऐंशी शिकाऊ परवाने व दोनशे चाळीस पक्के परवाने देण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे आरटीओ विभागाने सांगितले. यामुळे हजारो नवोदित वाहनचालकांना सोयीस्कररीत्या लायसन्स मिळणार आहे. आरटीओकडून असेही सांगण्यात आले आहे की, जे नागरिक शिकाऊ परवाना घेतात, त्यांनी सहा महिन्यांच्या आत पक्क्या परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. मुदतीत अर्ज न केल्यास पुन्हा प्रक्रियेची सुरुवात करावी लागेल.

वाहन परवाना नसताना वाहन चालविल्यास यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांकडून पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असून, अल्पवयीन वाहनचालक आढळल्यास त्यांच्या पालकांवरही दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात येणार आहे.

परवाना मिळवण्यासाठी अर्जदाराने अठरा वर्षे पूर्ण केलेले असावे. अर्ज करण्यासाठी आधारपत्र, पॅन, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वीजबिल, घरपट्टी पावती अशा कागदपत्रांची गरज भासते. अर्जदारास प्रथम संगणकीकृत चाचणी द्यावी लागते. त्यात यशस्वी झाल्यानंतरच शिकाऊ परवाना दिला जातो. पुढे पक्क्या परवान्यासाठी वाहनचालकांनी वेळेत अर्ज करणे बंधनकारक आहे.

संबंधित पोस्ट

ड्रॅगन पॅलेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून ग्रीन बस मिळणार,*ड्रॅगन पॅलेस मध्ये संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विक्रम होणार*

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

जन विश्वास विधेयक, 2026′ संसदेत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले समाधान

नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’ला ऐतिहासिक उड्डाण मुख्यमंत्र्यांकडून विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta