vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

ठाणे, प्रतिनिधी- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे आणि राजेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ठाणे व कळवा येथील रुग्णालयांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच, या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे जखमी व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

या हृदयद्रावक दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही सांगितले.

या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि जखमींना मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 10 मे रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन. 

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानाला अपघात, ५ जवानांना वीरमरण.

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे