vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

-भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई, भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे.

सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसेच सहा वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.जून २०२५ मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ RUPPs ची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. तपासणीदरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ३३४ पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही. उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत. परिणामी, आता देशातील RUPPsची संख्या २८५४ वरून २५२० वर आली आहे.

या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ब आणि २९क तसेच आयकर कायदा, १९६१ व निवडणूक चिन्ह आदेश, १९६८ अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच या पक्षांना आयोगाच्या आदेशाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करता येईल.भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील (१) अवामी विकास पार्टी, (२) बहुजन रयत पार्टी, (३) भारतीय संग्राम परिषद, (४) इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, (५) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, (६) नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, (७) पिपल्स गार्डियन, (८) दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि (९) युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.तपशीलवार यादीसाठी https://www.eci.gov.in/list-of-political-parties या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

संबंधित पोस्ट

शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य- उपराष्ट्रपती जगदीप धनखड· विकसित भारत केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य· के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

नवीन पाच पोलीस चौकींमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच पोलीस चौकींचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राज्य विधानसभा पोटनिवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊बारामती (महाराष्ट्र) – 31.91% राहुरी (महाराष्ट्र) – 29.67%दुपारपर्यंत मतदान

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग..

vishwatmaklokswamivarta

प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या    पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुका, ओला रंग लावू नका