vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*  

*उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*

 

मुंबई / देहरादून प्रतिनिधी ~ उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14 जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंड राज्यातील गाढवाल ; कुमाव या जिल्ह्यातील ग्रामपंचायत ; जिल्हा परिषद ; नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे.गढवाल भागात रिपब्लिकन पक्षाचे 4 ग्राम प्रधान निवडून आले आहेत. कुमाव क्षेत्र येथे 1 ग्राम पंचायत आणि 4 जिल्हा परिषद सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत. उत्तराखंड च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे.आगामी काळात रिपब्लिकन पक्ष उत्तराखंड सहित संपूर्ण उत्तर भारतात विजयी घोडदौड करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.विधानसभा जिंकण्याचा रस्ता हा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतील विजयावर अवलंबून असतो.त्यामुळे विधानसभा जिंकून देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वाच्या आहेत.त्यात रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा रिपब्लिकन पक्षाच्या उत्तराखंड मधील पुढील वाटचालीसाठी महत्वाचा आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग 172 कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानेअपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

दीपावली सणानिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु …

vishwatmaklokswamivarta

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta