vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत

   अमरावती, प्रतिनिधी : तेल काढणी युनिटसाठी शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्छुकांनी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 मध्ये काढणी पश्चात पायाभूत सुविधा या घटकांतर्गत तेल काढणी युनिट घटकाकरीता शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी आणि सहकारी संस्था यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये बियाणे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी 10 टन क्षमतेचा तेल काढणी युनिट आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिटकरीता प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लाख 90 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.

   केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सीपेट, लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल, ऑईल एक्सपीलिअरची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला अनुदान अनुज्ञेय राहिल. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक प्रक्रिया भागीदाराने केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा, बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधीत अर्जदार सदर बाबींच्या लाभास पात्र राहणार आहे.

योजनेच्या माहितीसाठी सहायक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी सपंर्क साधावा, तसेच इच्छुक अर्जदारांनी दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

परतवाड्यात 16 मे रोजी सेंट्रल बँकेचा ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम’; उद्योजकांना जागेवरच मिळणार कर्ज मंजुरी पत्र

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

महिलासक्षमीकरण-जिद्द, प्रशिक्षण आणि यशाची क्लिक..ठाण्याच्या पूजा साखरे यांचा फोटोग्राफीतील प्रेरणादायी प्रवास..