vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

अमरावती, प्रतिनिधी- पोलीस: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 चा निकाल आगामी काळात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

   यानुषंगाने याबाबत सूचित करण्यात येते की, 2 मे 2025 च्या शासन शुध्दीपत्रकान्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा (बी.एड/ डी.एल.एड.) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या तारखांना लागल्यामुळे टिएआयटी २०२५ परीक्षेचा निकाल लावण्यासाठी, माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. तसेच नुकताच दि. ०५ ऑगस्ट रोजी डी.एल.एड. चा सुध्दा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

उपरोक्त परीक्षेत पात्र उमेद्वारांच्या निकालाच्या अनुषंगाने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” च्या निकालाची कार्यवाही सुरु असून निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार / विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मोताळा तालुक्यातील अवसायनातील 34 संस्थांची नोंदणी रद्द होणार;आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरातील मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई -प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेंतर्गत एप्रिलच्या पंधरवड्यात 85 हजार दंडात्मक वसूली व 283.700 किलो प्लास्टिक जप्त…

हरित महाराष्ट्र’साठी जिल्ह्यात वृक्ष लागवड उद्दिष्टपूर्तीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी जिल्ह्यातील २१,९४० हेक्टरवर २कोटी ४४लाख वृक्षारोपण.

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta