vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिघा परिसरातील उग्र वासाच्या तक्रारीच्या अनुषंगाने मध्यरात्रीच्या गस्तीत केमिकल टँकर जप्त

दिघा परिसरातील उग्र वासाच्या तक्रारीच्या अनुषंगाने मध्यरात्रीच्या गस्तीत केमिकल टँकर जप्त

 

    नवी मुंबई प्रतिनिधी  – नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा विभागामध्ये ०७ ऑगस्टपासून ग्रीन वर्ल्ड सोसायटी आणि रामनगर परिसरात केमिकलचा उग्र वास येत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या भागात अथवा नाल्यामध्ये अज्ञात व्यक्ती उग्र रसायन सोडत असल्याचा संशय असल्याने पोलीस यंत्रणा, ऐरोली अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाला कळविण्यात आले होते. त्यानुसार सदर रसायन कोठे सोडण्यात येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत ग्रीन वर्ल्ड सोसायटी समोरील नाल्यातील पाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी नेण्यात आले होते.

       त्यानंतरही दिघा विभागातील अधिकारी/कर्मचारी तसेच पर्यावरण विभागातील अधिकारी/कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री अडकर आणि श्री.देशमुख तसेच नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण विभागातील कनिष्ठ अभियंता श्री.अजिंक्य पाटील व दिघा विभाग कार्यालयामार्फत पहाटेपर्यंत संयुक्त तपासणी दौरा करण्यात आला.

          या दौ-यामध्ये ग्रीन वर्ल्ड सोसायटीमधील पदाधिकारी व नागरिक यांच्याकडेही चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये ऐरोली मधील नेवा गार्डन सोसायटीच्या जवळ असलेल्या नाल्यामध्ये रात्री टँकरद्वारे केमिकल सोडण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमार्फत पाळत ठेवण्यात आली, तसेच रात्रीच्या वेळी गस्तही सुरु होती.

          या गस्तीमध्ये 11 ऑगस्ट रोजी रात्री साधारणत: १.०० वाजता. दिघा स्टेशन समोर मुकंद कंपनी गेटजवळ उभ्या असलेल्या संशयित टँकरच्या तपासणीमध्ये त्या टँकरमध्ये उग्र दुर्गंधीचे रसायन असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. सचिन आडकर, श्री. सचिन देसाई आणि श्री. देशमुख यांनी लिटमस पेपरद्वारे ते रसायन तपासले असता सदर रसायन हानीकारक असल्याचे आढळून आले. याबाबत पोलीस हेल्पलाइन ११२ क्रमांकावर तक्रार नोंद करण्यात आली. त्यानुसार पोलीस बीट मार्शल आणि विभागाचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे दिघा विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त श्री. नैनेश बदले व पर्यावरण विभागातील कनिष्ठ अभियंता श्री. अजिंक्य पाटील या सर्वांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावर ग्रीन वर्ल्ड सोसायटीचे सेक्रेटरी व रहिवासी यांची साक्ष घेण्यात आली. घटनास्थळी उभ्या असलेल्या टँकर मधील रसायनाचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि नमुंमपा पर्यावरण विभाग यांच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे

.0000000

संबंधित पोस्ट

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

ज्येष्ठ नागरिक अत्याचार निर्मूलन व संरक्षण दिन  14 जून रोजी धारावीत ज्येष्ठ साठी विशेष कार्यक्रम

प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा; जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांचे  प्रशिक्षण नियोजन व मूल्यमापनासाठी प्रशिक्षण आवश्यक- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर