vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

 

रायगड –अलिबाग, प्रतिनिध
प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई आणि जिल्हाधिकारी व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार १ डिसेंबर जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्फत १ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध जागरूकता उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचा एक भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व पथकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.
 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श संजय माने यांनी एचआयव्ही/एड्सची कारणे, प्रतिबंधक उपाय, गैरसमज आणि एआरटी उपचार पद्धती याबाबत वैज्ञानिक माहिती दिली. लग्नापूर्वी ब्रह्मचर्य पाळणे, वैवाहिक नात्यात निष्ठा राखणे, तसेच संसर्गाचा धोका असल्यास लैंगिक संबंधांच्या वेळी निरोधाचा वापर करणे याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
तसेच आयसीटीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील २५० शाळा, २३० गावे आणि ४६ महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जागतिक एड्स पंधरवड्यानिमित्त ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू’- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta