vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण 100% जलसमृद्ध

नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण 100% जलसमृद्ध

         नवी मुंबई प्रतिनिधी – मागील सहा दिवस सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज बुधवार दिनांक 20/8/2025 रोजी पहाटे 3.10 वाजता मोरबे धरणाचे (12 मी.× 3 मी. आकाराचे) दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.

           नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने (८८ मी.) भरलेले असून नवी मुंबईच्या जलसमृद्धतेत वाढ झाली आहे. याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

            या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

कमलादेवी कॉलेज आणि जेएसएस फाउंडेशनचा ‘प्रारंभ’ इव्हेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta

माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर.! नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मा.संतोष बोराटे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तिपत्र

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta