
मुंबईत कोरोना नियमांचे उल्लंघन, मालाडचे “डी मार्ट मार्केट “सिल. पी /उत्तरमहानगरपालिका. विभागाची कारवाई.
मुंबई प्रतिनिधी : कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन होत नसल्याबद्दल, पी नोर्थ महानगरपालिकेने मालाड येथील डी मार्ट सिल केले आहे. संबंधीत व्यवस्थापनाला नोटीस देऊन तीन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. साथ नियंत्रण कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या स्टोअरचे परवान रद्द होण्याची शक्यता आहे. कोविड नियमांचे पालन करताना स्टोअर मध्ये जास्तीत जास्त 150 व्यक्ती उपस्थीत राहाणे बंधनकारक होते.मात्र,पालिकेच्या पाहाणीत तब्बल 600 च्या आसपास व्यक्ती स्टोअर मध्ये उपस्थीत होत्या. मुंबईत आजही कोविड प्रतिबंधक नियमावली नुसार लॉकडाऊन लागू आहे.त्यात,अत्यावश्यक सेवेचे व्यवसाय शनिवारी रविवारीही करण्याची परवानगी आहे.मात्र,नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.
मालाड पश्चिमेकडील लिंक रोडवरील या स्टोअर मध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे पालिकेच्या तपासणीत आढळले.कर्मचाऱ्यांनी विशेषत: बिल कांऊटर वरील कर्मचाऱ्यांनी मास्क व हातमोजे वापरले नव्हते.तसेच,कर्मचारी,ग्राहक वावरत असताना सुरक्षीत अंतर पाळले जात नसल्याचे आढळले असून एकाच वेळी गर्दी झाल्याचे दिसत होते.यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेच्या पी उत्तर विभागा कार्यालया मार्फत सांगण्यात आले. कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने पुढील आदेशा पर्यंत हे स्टोअर सिल केले आहे.,तसेच,नियमभंग प्रकरणी परवान कायमस्वरुपी का रद्द केले जाऊ नये याबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी नोटीस पाठवली आहे.



