vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

जालना प्रतिनिधी :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कालावधी CDS कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे.

मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare,Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे. सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी

खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परिक्षेकरीता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ईमेल आय डी व दुरध्वनी क्रमांक 0253 -2451032 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज- आशिष फुलुके- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ प्रकरणे पात्र- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र…

आताची मोठी बातमी – मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यभर जाणवतोय 🌧️सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस. 

vishwatmaklokswamivarta

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन..

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे