vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून प्रवेशासाठीपुणे येथे 7 डिसेंबरला पात्रता परीक्षा..

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून प्रवेशासाठीपुणे येथे 7 डिसेंबरला पात्रता परीक्षा..

सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. या परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक 1 जुलै 2026 रोजी 11 वर्षे 6 महिने पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थी / विद्यार्थिनीचा जन्म दिनांक 2 जुलै 2013 च्या आधीचा व दिनांक 1 जानेवारी 2015 च्या नंतरचा नसावा

आवेदनपत्र ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून मागवू शकतो. परीक्षेचे माहितीपत्रक व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेअराडून यांच्याकडून मागविण्याकरिता राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधारण व इतर संवर्गाकरिता 600 रूपये व अनुसूचित जाती / जमाजी करिता 555/- रूपये भरून आवेदनपत्राची मागणी करता येईल.

आवेदनपत्र परिपूर्णपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे-411004 या पत्त्यावर दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. कुठल्याही परिस्थितीत आवेदनपत्र RIMC कडे जमा करू नयेत.

अधिक माहितीसाठी 020-29709617 या दूरध्वनीवर, email : mscepune.in किंवा www.mscepune.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी-उपमुख्यमंत्री यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान- उपमुख्यमंत्री अजित पवार