vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उद्योजक मेळाव्यासाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

उद्योजक मेळाव्यासाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, प्रतिनिधी.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व “दे आसरा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेमध्ये उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, सांगली-मिरज रोड, सांगली यांचे स्व. डॉ. ए. डी. शिंदे सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना मार्गदर्शन लाभावे व उद्योजक तरुण-तरुणींना व्यवसायाची प्रेरणा मिळावी यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांनी https://forms.gle/Xdy8N8wtvkMHhvkK7 या गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

विविध क्षेत्रांतील सूक्ष्म, लघु व नवउद्योजक एकत्र आणून ज्ञानाची देवाणघेवाण करणे, नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करुन देणे तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी आणि नवीन उद्योजक घडावेत व जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळावी यासाठी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सुपा MIDC मध्ये उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही ! औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण व सुरक्षितता जपण्यास शासन कटिबद्ध ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मेहकर येथील एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीशन्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात..

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी-जिल्हाधिकारी संतोष पाटील