vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

 सांगली, प्रतिनिधी आंतरजातीय विवाहित दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 या योजनेमध्ये अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती व सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येतो. शासन निर्णय दि. 6 ऑगस्ट 2004 व दि. 1 फेब्रुवारी 2010 अन्वये मागास वर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गातील आंतरजातीय विवाहितांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2010 पूर्वी झालेल्या विवाहास 15 हजार रूपये व तद्नंतर झालेल्या विवाहास 50 हजार रूपये अर्थसहाय्य केले जाते.

 योजनेसाठी पात्रतेचे निकष – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विवाहित जोडप्यापैकी एक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज्‍/ विमाप्र व दुसरा सवर्णापैकी एक असावा, विवाहाची नोंदणी आवश्यक आहे.

 आवश्यक कागदपत्रे – विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला विवाह नोंदणी दाखला, वराचा व वधूचा (प्राथमिक/माध्यमिक) शाळा सोडल्याचा दाखला, वराचा व वधूचा जातीचा दाखला, वराचे व वधूचे तहसिलदार यांनी दिलेले अधिवास (डोमोसाईल) प्रमाणपत्र, दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचे वर्तणुकीचे व रहिवासी दाखले, वधू व वराचा एकत्रित फोटो (4X6), विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र, वधू व वर यांचे ओळखपत्र (आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीपैकी एक), वधू व वर यांच्या संयुक्त बँक खात्याची पासबुकची सत्यप्रत.

00000

संबंधित पोस्ट

धानाकरिता १३०६.४६ कोटी व भरडधान्यकरिता२१.८४ कोटी निधी वितरितखरीप हंगाम २०२५–२६ अंतर्गत धान/ भरड धान्य खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध.

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोगाकडून वकील व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा- हवामान विभागाचा अंदाज

vishwatmaklokswamivarta