vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

भाजपा जालना महानगर तर्फे गणेश मंडळाचे स्वागतआपल्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव आहे,” – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भाजपा जालना महानगर तर्फे गणेश मंडळाचे स्वागतआपल्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव आहे,” – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना, (प्रतिनिधी) भाजपा जालना महानगर तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश मंडळ स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील सर्व गणेश मंडळांचे पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत करून मंडळांचा सन्मान करण्यात आला. शनिवार, दिनांक 06 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता छत्रपती संभाजीराजे उद्यान (मोतीबाग), जालना येथे हा सोहळा पार पडला.

जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील ऐक्य, बंधुता आणि सामाजिक एकजुटीचे प्रतीक आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये संस्कार, शिस्त व समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होत असते. त्यामुळे मंडळांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव करणे होय असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य, राजेश राऊत, मंडळ अध्यक्ष महेश निकम, धनराज काबलिये, ज्ञानेश्वर ढोबळे, शशिकांत घुगे, सुनील राठी, राजेंद्र भोसले, सिद्धिविनायक मुळे, वसंत शिंदे, सुनील पवार, शिवराज जाधव, संध्याताई देठे, वैशाली बनसोडे, पुष्पा मेहेत्रे, मनोज बिडकर, जगदीश येनगुपटला, राजू गवई, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, मनोज इंगळे, तुकाराम बखळे, कैलास उबाळे, सुदर्शन काळे, शाम उगले, निलेश गवळी, अनिल यशवंते, दौलत भुतेकर, आदींसह उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत‍ छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले…

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ सज्ज

vishwatmaklokswamivarta

मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदीच्या सहायक अनुदानात दुप्पट वाढ; निर्दोष बंद्यांनाही पुनर्वसनासाठी आता मिळणार ५० हजार रूपयांचे अनुदान- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी