vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

परळी / प्रतिनिधी-  येथील दै. मराठवाडा साथीचे संपादक सतिशमोहनलाल बियाणी यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते. कै. सतिश बियाणी यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक मराठवाडा साथीचे संपादक म्हणून सतिश बियाणी यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परळी शहरातील अनेक पत्रकार घडवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. स्व. मोहनलालजी बियाणी यांनी सुरू केलेल्या दैनिक मराठवाडा साथीच्या भरभराटीमध्ये सतीश बियाणी यांचा मोलाचा वाटा होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मराठवाडा साथीचे वटवृक्षात रूपांतर केले. धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये ते सहभागी होत असत. मराठवाडा साथीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. उपचार सुरू असतानाच संभाजीनगर येथील एका खाजगी दवाखान्यांमध्ये त्यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला   कै. सतीश बियाणी यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, भावजई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

आज संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार कै. सतिश बियाणी यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सिडको बसस्टॅण्डच्या पाठीमागे, हॉटेल ग्रँड कैलासच्या बाजूला, प्रविण मॅजिकच्या बाजूची गल्ली, श्री अंजनी कुरिअर्सच्या समोर सिडको, छत्रपती संभाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

 

००००

संबंधित पोस्ट

रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा**• रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क*• नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन*

महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन