vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

नांदेड, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी (दि. 12 मे) अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागासह पंचायत समिती, गट विकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, उपकोषागार कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालयाला भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

तहसील कार्यालयात त्यांनी महसूल विभागातील सर्व कार्यासनांना भेट देत प्रत्येक विभागाच्या जाबचार्टची तपासणी केली. तसेच ‘आरटीएस’ अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची पडताळणी करून प्रलंबित प्रकरणे नसल्याची खात्री केली. अभिलेख कक्षालाही भेट देऊन अभिलेखांच्या नक्कल वितरण प्रक्रियेची पाहणी केली व कामकाज अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शासकीय जमिनींच्या अभिलेख पडताळणीसाठी विशेष शिबिर सुरू होते. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि कर्मचारी विविध गटांच्या नोंदींची पडताळणी करत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाचा आढावा घेत उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तहसील कार्यालयाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनांची माहिती घेतली. शासकीय जमिनींवर निवासी प्रयोजनासाठी झालेल्या अतिक्रमणांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत का, याबाबतही त्यांनी विचारणा केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाच्या कामांची माहिती घेऊन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय उपकोषागार कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय आणि पुरवठा विभागाचीही पाहणी करण्यात आली. पुरवठा विभागाकडून इष्टांकासंदर्भातील माहिती घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी तहसीलदार रेणूकादास देवणीकर, नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे, आश्विनी केंद्रे, अव्वल कारकून विश्वंभर सोळंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांच्या काळात जिल्ह्यात मनाई आदेश-परीक्षा केंद्रांभोवती 50 मीटर परिसरात निर्बंध; झेरॉक्स दुकाने बंद राहणार

vishwatmaklokswamivarta

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे निर्देश विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta