vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द..

राज्य प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत उमेदवारांना उपलब्ध असलेले ‘ऑप्टिंग आऊट’ तसेच ‘संमती’ (गिव्ह अप / ॲक्सेप्टेड) हे पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाने जारी केले आहे.

आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी ‘ऑप्टिंग आऊट’ ही संकल्पना लागू केली होती. त्यानुसार निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, या पर्यायासंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांसाठी भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे (ऑप्टिंग आऊट) तसेच संमती (गिव्ह अप / ॲक्सेप्टेड) देणे हे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत

एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी राहणार नाही

बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवाराला ज्या पदावर अगोदरच नियुक्ती मिळाली आहे अशा पदाचा किंवा निम्न पदाचा पर्याय उमेदवाराने पसंतीक्रमात दिल्यास त्याचा त्या पदावरील किंवा निम्न पदावरील शिफारशीसाठी विचार केला जाणार नाही.

हा निर्णय १३ मे २०२६ पासून अमलात येणार असल्याचे आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा. भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होईल. 

वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून उपक्रम; इंडिगोच्या सीएसआर कार्यक्रमातून मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी करतो. नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणची शक्ती असून विश्वशांतीसाठी या महामंत्राच्या जपाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन