vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार

 अमरावती, आरोग्य प्रतिनिधी : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे राष्ट्रीय अभियान देशभरात राबवले जाणार आहे. त्याच दिवशी जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

या अभियानात ग्रामीण आणि शहरी भागातील महिला व मुलांची तपासणी आणि विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी. तसेच, जोखमीच्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि लसीकरण करण्यात येणार आहे.

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे. तसेच, खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. या उपक्रमात आयुष्मान भारत डिजिटल मिशन कार्ड आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी आणि कार्ड वाटप केले जाईल. या अभियानात विविध तपासणी शिबिरे आयोजित करून रुग्णांना आवश्यक तेथे तज्‍ज्ञ डॉक्टरांकडे पाठवले जाईल आणि त्यांच्या सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. राज्यात १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ उपक्रम आयोजित केले आहेत, ज्यात आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी, दंत तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि व्यसनमुक्ती सत्रे यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ३३५ उपकेंद्रे, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १६ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर रुग्णालये या अभियानात सक्रियपणे सहभागी होणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

विशेष वृत्त :सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी..

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जागतिक हिवताप दिनानिमित्त25 एप्रिल रोजी मोहिमेचे आयोजन